Shah Rukh Khan : पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा 'तो' व्हिडिओ चर्चेत!

मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. सर्व स्तरावरून य घटनेचा निषेध केला जात आहे. देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी घडलेल्या या भयानक घटनेनंतर अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) देखील दु:ख व्यक्त केलं. अशातच आता शाहरुखचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्यानं दहशतवाद आणि इस्लाम धर्माबाबत मोठं विधान केल्याचं पाहायला मिळतंय.



पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने दोन प्रकारच्या इस्लामवर भाष्य केलं. एक म्हणजे ''दहशतवाद्याचा कट्टरपंथी इस्लाम आणि दुसरा इस्लाम ज्याचा पवित्र ग्रंथ कुराणात उल्लेख करण्यात आलाय. इस्लाम धर्माची संकल्पना परिभाषित करताना शाहरुख म्हणाला, "मी खोटे बोलणार नाही. २-३ वर्षांपूर्वी जर कोणी मला सांगितलं असतं की दहशतवाद हा इस्लामी स्वरूपाचा आहे. तर मी तो नाकारला असता. पण आता मला समजलंय की दहशतवादी ज्या इस्लामचे पालन करत आहेत, तो आमचा इस्लाम नाही. तो आमचा धर्मच नाही".

इस्लाम दयाळूपणा शिकवतो हे स्पष्ट करण्यासाठी शाहरुख खानने सूरह अल-माइदाच्या ३२ आणि ३३ व्या ओळींचा उल्लेख केला. शाहरुख म्हणाला, "पवित्र कुराणात अल्लाहने म्हटले आहे की जर कोणी एखाद्या व्यक्तीला बरं केलं तर तो संपूर्ण मानवजातीला बरे करतो आणि जर कोणी एखाद्या व्यक्तीला दुखावलं तर तो संपूर्ण मानवजातीला दुखावतो. अल्लाहने मुस्लिमांना इस्लामच्या फायद्यासाठी लढलेल्या युद्धातही शत्रूंच्या महिला, मुले, प्राणी आणि पिकांना इजा करू नये असे निर्देश दिलेत. मला हे सांगताना वाईट वाटतंय आणि मला कोणाच्याही विरोधात जायचे नाही, पण, हे दहशतवादी ज्या दुसऱ्या इस्लामचं पालन करत आहेत, ती मुल्लांची भाषा आहे".



शाहरुख खान म्हणजे धर्मनिरपेक्ष अभिनेता 


शाहरुख खान हा सर्वात धर्मनिरपेक्ष अभिनेता मानला जातो. त्याचे कुटुंब याचा पुरावा आहे. तो प्रत्येक धर्माचा आदर करतो. किंग खानची पत्नी गौरी ही हिंदू आहे आणि तिने लग्नानंतर धर्म बदलेला नसून ती आजही हिंदू धर्माचे पालन करते. तसेच शाहरुख आणि गौरीची मुले आर्यन, सुहाना आणि अबराम हेदेखील सर्व सणांचा आदर करतो. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'किंग' चित्रपटात दिसणार आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत