
परभणी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता राज्यभरातून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोल्यानंतर आता ३० वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या परभणीमध्ये उभी फूट पडली आहे. परभणी विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1552716064336875523परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला, मात्र जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे दिसत आहे. प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1552716084800901122शिवसेनेत बंडखोरी करीत आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1552706598606340098पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना आपल्या तंबूत घेण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. कोल्हापुरात माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर यांची नावे भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत. सांगली जिल्ह्यातील काही नेते भाजपच्या मार्गावर आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत मदत होईल, असे प्रमुख कार्यकर्ते हेरण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1552706610740576257