मोठा अपघात टळला; धावत्या पाटलीपुत्र एक्सप्रेसचे डबे इंजिनपासून झाले वेगळे

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसला मोठा अपघात टळला आहे. धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे वेगवेगळे झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, गाडी धावत असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) ही मुंबईहून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेले तर रेल्वेचे अर्धे डब्बे मागेच राहिले. डब्ब्यांचे कपलिंग सुटल्याने अर्धी ट्रेन मागे राहिली. मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डबे सोडून पुढे गेलेले इंजिन परत मागे आणण्यात आणि ते पुन्हा वेगळे झालेल्या डब्यांना जोडण्यात आले.


पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेच्या इंजिनला सर्व डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर एक्सप्रेस मधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. प्रसंगावधान राखून सर्व नागरिक गाडीतून बाहेर पडले. दरम्यान, घटनेतील प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणानंतर खिळे काढले, वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

सोलापूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी

भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम राबवणार! म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानात ५ दिवस उपोषण करत, सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे