हिंदू वेशात आलेल्या २ मुस्लीम तरुणांकडून ३ दर्ग्यांमध्ये तोडफोड

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सख्ख्या मुस्लीम भावांनी तीन दर्ग्यांवर गोंधळ घातला. त्यांनी कबरीवरील चादरी आणि पडदे जाळले. यादरम्यान वातावरण चिघळण्यापासून थोडक्यात वाचले. हे दोघे भाऊ पकडले गेले नसते तर जिल्ह्यात वणवा पेटला असता आणि स्थिती वेगळी असती, हे निश्चित. या प्रकरणात कमल आणि आदिल या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्ह्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलीस अधिक्षक परिसरात तळ ठोकून आहेत.


जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे, ज्यात दोन मुस्लीम बांधवांनी तीन धर्मस्थळांवर गोंधळ घातला. जिल्ह्यातील वातावरण खराब करण्यासाठी त्यांनी हे सर्व केले. कमल आणि आदिल या दोन सख्ख्या भावांनी तीन ठिकाणी दर्ग्यात जात मजारचे नुकसान केले. त्यांनी याठिकाणची चादर आणि पडदे जाळून राख केले.


परिसरातील लोकांनी हे सगळे पाहिले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कमल आणि आदिल या दोन्ही भावांना अटक केली. घटनेची माहिती मिळताच डीएम उमेश मिश्रा आणि एसपी दिनेश सिंह यांनी घटनेचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस दोन्ही भावांची कसून चौकशी करत आहेत. या तोडफोडीमागील नेमकी कारणं काय याचा शोध पोलीस चौकशीत घेत आहेत.


या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले, "शेरकोट पोलिसांनी मोठी घटना घडण्यापासून रोखली. पोलिसांना ही माहिती पाच वाजण्याच्या सुमारास मिळाली की जलाल शाह मजारवर तोडफोड करून चादरी जाळण्यात आल्या आहेत. यावर कडक कारवाई करत पोलीस तपास करेपर्यंत त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरेशहा मजारवर तोडफोड झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे पोहोचून तिथेही कारवाई केली.


पोलिसांनी सांगितले की, कमल आणि आदिल अशी या दोन व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. या दोघांनी डोक्यावर भगव्या रंगाचा पट्टा बांधला होता आणि त्यांनी ही तोडफोड केली. कावड यात्रेदरम्यान हे सर्व घडवून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. सध्या या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे