इंदापूरमध्ये शिकाऊ विमान कोसळले, महिला पायलट जखमी

पुणे (हिं.स) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडीमध्ये शिकाऊ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात महिला पायलट किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज आहे.


स्थानिकांच्या मदतीने या महिला पायलटवर उपचार करण्यात आले असून, गंभीर दुखापत नसल्याची माहिती समोर येत आहे. या विमानाने आज सकाळी बारामतीहून उड्डान केले होते. दरम्यान विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी परिसरात आले असता अचानक कोसळले. विमान कशामुळे पडले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत सुदैवाने पायलट बचावली आहे. मात्र विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत पायलटला सुरक्षित विमानातून बाहेर काढले.


दरम्यान विमान शेतात कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारीच असलेल्या पोंदकुले वस्तीतील तरुणांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचले असता त्यांना विमानाचा अपघात झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या तरुणांनी घटनास्थळी तातडीने बचावकार्य राबवत महिला पायलटची विमानातून सुखरूप सुटका केली.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे