संजय पांडे यांना ९ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली (हिं.स.) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) फोन टॅपिंग प्रकरणात त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना ९ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे.


यापूर्वी सीबीआयने १८ जुलै रोजी संजय पांडे यांची चौकशी केली होती. ईडीने संजय पांडे यांना अटक करण्यापूर्वी त्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. याशिवाय सीबीआयनेही या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणात माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशिवाय इतरही अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे समोर आली आहेत. या यादीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णा यांच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी संजय पांडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक होते.


यानंतर एप्रिल २०२१ मध्ये उद्धव ठाकरे सरकारने त्यांना महाराष्ट्राच्या डीजीपी पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली, मात्र रजनीश सेठ यांना महाराष्ट्राचे डीजीपी बनवल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. नंतर त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात आले. १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे ३० जून रोजी पोलिस सेवेतून निवृत्त झाले आहेत. २०१० आणि २०१५ दरम्यान, iSec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला एनएसईच्या सर्व्हर आणि सिस्टम सुरक्षेशी संबंधित एक कॉंट्रॅक्ट देण्यात आले होते. या प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडी संजय पांडे यांची चौकशी करत आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडी त्याची चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील