विस्तारवादी चीनकडून ‘चिकन नेक’जवळ आगळीक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका बाजूला भारतासोबत लडाखमधील सीमा प्रश्नावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनची विस्तारवादी भूमिका कायम असल्याचे समोर आले आहे. भारतासाठी रणनीतिकदृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या 'चिकन नेक' जवळ चीनने आगळीक केली आहे. भूटानच्या बाजूने असलेल्या डोकलामजवळ चीनने एक गाव वसवले असल्याचे संकेत देणारे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. हे फोटो मेक्सर कंपनीने घेतले आहे. मेक्सर कंपनी अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.


डोकलाम ट्राय-जंक्शनवर वर्ष २०१७ मध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. जवळपास ७३ दिवस तणाव कायम होता. त्यावेळी चीनने डोकलाम भागात रस्ता निर्मितीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी भूतानने आक्षेप घेत विरोध केला होता. नवीन सॅटेलाइट फोटोनुसार, अमो चू नदीच्या खोऱ्याजवळ चीन गाव वसवत आहे. या ठिकाणचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याशिवाय, चीनने दक्षिण क्षेत्रात तिसरे गाव वसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. फोटोमध्ये सहा इमारतींचा पाया रचला असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, इतर बांधकामेही सुरू असल्याचे फोटोत दिसत आहे.


अमेरिकन कंपनी मेक्सरने घेतलेल्या सॅटेलाइट फोटोच्या आधारे 'एनडीटीव्ही' ने वृत्त दिले आहे. या सॅटेलाइट फोटोत गावातील प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ एक कार उभी असल्याचे दिसते. या नव्या फोटोबाबत भारतीय लष्कराने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.


डोकलाम हा भारत-चीन आणि भूतानमधील 'ट्रायजंक्शन' तिन्ही देशांना जोडणारा मध्य भाग आहे. 'चिकननेक' म्हणून ओळखला जाणारा भाग हा पश्चिम बंगालपासून केवळ ४२ किलोमीटर दूर आहे. शिवाय, यामुळे सिलीगुडी कॉरिडॉरमधील भारतीय मनुष्यवस्ती असलेल्या जवळपास ३५ ते ४० किलोमीटरच्या भागावरही याचा परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे, याच बाजूला नेपाळची सीमाही आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत चीनच्या या रस्त्याचा भारताला सर्वात मोठा धोका आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे