आज मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी तसेच सिग्नल यंत्रणेची कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे - ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप -डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत.


सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मात्र १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील, तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर थांबवल्या जातील. पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.


पश्चिम रेल्वे - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत.


या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान अप- डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच डाऊन दिशेच्या काही गाड्या रद्द.


हार्बर रेल्वे - सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत.


सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव करिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द. तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा.

Comments
Add Comment

उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना चक्क 'रॅट किलर' औषध लावलं; दोघांना अटक

मुंबई: मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधान! कारण मालाड परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान