मुंबई (प्रतिनिधी) : ‘देऊ तो शब्द पूर्ण करू’ याचा प्रत्यय भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. मागील आठवड्यात निलेश राणे यांनी लोकराजा स्व. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी कलिंगण यांच्या मुलाला धीर देताना कुटुंबीयांच्या प्रत्येक प्रसंगात मोठ्या भावाप्रमाणे आपण पाठीशी राहू, हा शब्द त्यांनी दिला होता.
दिलेल्या शब्दाप्रमाणे कलिंगण कुटुंबीयांचा एक आर्थिक प्रश्न निलेश राणे यांनी मार्गी लावला आहे. दरम्यान कै. सुधीर कलिंगण यांचे ज्येष्ठ पुत्र सिद्धेश याने निलेश राणे यांची मुंबई येथे भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत.दशावतारातील लोकराजा म्हणून प्रसिद्ध असलेले कोकण रत्न कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या कुडाळ-नेरूर येथील निवासस्थानी मागील आठवड्यात निलेश राणे यांनी भेट घेतली होती.
या भेटीत त्यांनी सिद्धेश कलिंगण व पंकज कलिंगण यांना तुम्ही मला कधीही आवाज द्या, मी मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन. असा शब्द देत त्या कुटुंबीयांचा आर्थिक अडचणीचा विषय लवकरच सोडवण्याचा शब्द दिला होता. हा शब्द पूर्ण करून कलिंगण कुटुंबाला आर्थिक स्वरूपात खूप मोठा आधार निलेश राणे यांनी दिला आहे. युवा पिढीच्या मनातील राजा आणि जनतेच्या कामाचा राजा माणूस म्हणून निलेश राणे यांनी आपले कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…