नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य,पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आज राज्याला सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्या वतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी व योजनेच्या जागरूकतेकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तर प्रदेशला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरित करण्यात आला.
केंद्र शासनाने पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी वर्ष २०२० मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरु केली. राज्यातील उद्योजकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाकडे एकूण ९१६ अर्ज प्राप्त झाले होते यापैकी पात्र ७३ अर्जांमधून आतापर्यंत २६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. या उद्योजकांना ७९३ कोटींचे कर्ज वाटप आणि ५३ कोटींची व्याज सवलत देण्यात आल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्य शासनाला एकूण १५ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्रातील २० उद्योजकांचा सन्मान
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील ७५ व्यक्ती व संस्थांना या संमेलनात गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील २० व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे. या कार्यक्रमात ७५ पैकी प्रातिनिधिक १० उद्योजकांना केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…