डोंबिवली (प्रतिनिधी) : मोबाइल, संगणक, ऑनलाइन व्यवहार या साधनांचा उपयोग हल्ली मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यात शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली प्रोग्रेसिव्ह ट्रस्ट संचालित ग्रीन इंग्लिश स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना सायबर लॉ आणि सुरक्षा अवेअरनेस, या विषयावर सावित्रीबाई फुले नाट्यगृहात नुकतेच एक सेमिनारमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सायबर सेलचे मुंबई पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे बोलत होते.
सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पण साधनांचा वापर करत असताना काय काळजी घ्यावी, काय करू नये, यासंदर्भात अधीक्षक शिंत्रे यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. प्रत्यक्षात घडत असलेल्या घडामोडींची उदाहरण देत त्यातील घडत गुन्ह्यांचे गांभीर्य समजावून सांगितले. शाळकरी मुले-मुली अज्ञान व निष्काळजीपणा मुळे सायबर गुन्ह्यांमध्ये बळी ठरत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. यावेळी शाळेचे उपाध्यक्ष आणि साबरतज्ञ अॅड. शिरीष यांनी सुरूवातीला सायबर सेल तोंड ओळख करून दिली.
यावेळी विश्वस्त अमर देशपांडे, डॉ. अरुण पाटील, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खिल्लारे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोनि. उत्तम गित्ते, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका अर्चना मोहिते यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.