गुजरात एटीएसने जप्त केले ३५० कोटींचे ड्रग्ज

अहमदाबाद (हिं.स.) : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून ३५० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. जहाजाच्या माध्यमातून हे अंमलीपदार्थ भारतात आणण्यात आले होते. यापूर्वी सीमा सुरक्षा दलाने चार पाकिस्तानी मच्छिमारांना अटक करत गुजरातच्या किना-या जवळून १० मासेमारी नौका जप्त केल्या होत्या. त्यानंतर आज ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.


एटीएसने मंगळवारी जप्त केलेल्या जहाजामधून प्रामुख्याने हेरॉईन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याची बाजारपेठेतील किंमत ३५० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये, मुंद्रा बंदरावर देशातील अंमली पदार्थांची सर्वात मोठी कारवाई करत २१ हजार कोटी किमतीची ३ हजार किलो ड्रग्सची खेप जप्त करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले होते.


यावर्षी फेब्रुवारीमध्ये, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवरील एका जहाजातून २ हजार कोटींहून अधिक किमतीचे ७५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात, नऊ पाकिस्तानी नागरिकांना गुजरात एटीएसने, भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत २८० कोटी किमतीच्या हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना अटक केली होती.

Comments
Add Comment

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी