सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ६.२२ वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्याने कोणतीही हानी यामध्ये झाली नसल्याचे स्पष्टीकरण देखील प्रशासनाने दिले आहे.


कर्नाटकतील विजापूरपासून १० किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


सोलापूर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी साडे सहाच्या सुमारास हे भुकंपाचे धक्के जाणवल्याच्या माहिती नागरिकांनी दिली.


कर्नाटकात मागील काही दिवसांपासून सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी विजयापुर येथील स्थानिक नागरिकांना देखील धक्के जाणवले होते. त्यावेळी प्रशासनाने भूकंपाचे धक्के नसून पावसामुळे भूगर्भीय हालचाली असल्याचे सांगितले होते. मात्र आज जाणवलेले धक्के हे भूकंपाचे असून विजयापूर पासून १० किलोमीटर अंतरावर भूकंप केंद्र असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री