कुआला लुम्पुर (वृत्तसंस्था) : भारताची आघाडीचे बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि साई प्रणीत यांनी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने पहिल्या सामन्यात चीनच्या बिंग झियाओचा पराभव केला, तर पुरुष एकेरीत साई प्रणीतने केविन कॉर्डन गौतेमालाला धूळ चारली.
२८ वर्षीय पी.व्ही. सिंधूने पहिल्या फेरीच्या सामन्यात चीनच्या बिंग झियाओचा २१-१३, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाची नात कुसुमा वरदानी आणि चीनच्या जिंग यी मेनच्या विजेत्याशी होईल. पुरुष एकेरीत साई प्रणीतने विजयाने स्पर्धेची सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीत केविन कॉर्डन गौतेमालाचा २१-८, २१-९ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत साई प्रणीत चीनच्या ली शी फेंगशी खेळेल.
या विजयानंतर दोघांचे पराभव आणि विजयाचे अंतर ९-१० असे झाले आहे. म्हणजेच दोघांमध्ये आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. यापैकी भारतीय खेळाडूने ९, तर चीनच्या खेळाडूने दहा जिंकले आहेत. इंडोनेशिया ओपनमध्ये झियाओने पहिल्या फेरीत सिंधूला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. पी.व्ही. सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनच्या रूपाने दोन सुपर ३०० खिताब जिंकले आहेत. सिंधूने सातत्याने वर्ल्ड टूर स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरी गाठली आहे.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…