नदीत वाहून जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले

  94

सिंधुदुर्ग (हिं.स.) : आंबोली येथील हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. आंबोली दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी आपल्या जीवावर बेतून महिलेला वाचविले. ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास गेळे-कावळेसाद जाणाऱ्या रस्त्यावर घडली. जान्हवी शिंदे (२९) रा.कणकवली, असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते यांनी दिली.


कणकवलीतील हि विवाहिता आपला पती आणि मुलासह आंबोलीत फिरायला आली होती. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन ती पुराच्या पाण्यात कोसळली. पुराच्या पाण्यात वाहून जात असताना सदर महिलेने प्रसंगावधान दाखवित नदीतील झाडीला पकडले. त्यानंतर त्यांच्या पतीने ११८ नंबर वर फोन करुन पोलीसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.


पोलीस कर्मचारी दत्ता देसाई यांनी आपला जीव धोक्यात घालत दोरखंडाच्या सहाय्याने त्या महिलेला बाहेर काढले. पोलीस कर्मचारी अभिजित कावळे, संभाजी पाटील, अमित गोते आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. शिंदे कुटुंबियांनी पोलीसांच्या कार्यतत्परतेबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

आमची स्पर्धा विकासकामांशी : आमदार निलेश राणे

पावशी येथे जिल्हास्तरीय शिवसेना मेळावा संपन्न कुडाळ : पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेचा

कणकवलीत अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा!

शुभेच्छा देण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोटला जनसागर ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी कणकवली :

Nitesh Rane : 'तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला'...अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा टोला

आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? - मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे

Sindhudurg Accident News: देवगडमध्ये एसटीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू,

Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे