'चार वेळा माजी उपमुख्यमंत्री जे एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत,” निलेश राणेंचा पवारांना टोला

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची गुरुवारी शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिल्याची राज्याच्या राजकारणामध्ये बरीच चर्चा आहे.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यावरुन भाष्य करताना केलेल्या एका वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी थेट अजित पवारांचा उल्लेख करत पवार कुटुंबियांना टोला लगावला आहे.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1542723174336385025

ट्विटरवरुन त्यांनी निशाणा साधला आहे, ‘पवार म्हणाले, ‘फडणवीस एकमेव माजी मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री झाले’, अजित पवार चार वेळा माजी उपमुख्यमंत्री जे एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत,” असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील