मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले.
त्यांच्या त्यागाचा भाजपला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी प्रदेश भाजपतर्फे शुभेच्छा दिल्या.
ते मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे, माधव भांडारी, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, कृपाशंकरसिंह, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार बबनराव लोणीकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुनील कांबळे व आमदार नारायण कुचे उपस्थित होते.
भाजपचा जल्लोष
शुक्रवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजप सत्तेत आल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर आदी नेते यात सहभागी झाले होते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…