शिंदे गटाचे नाव ठरले! 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे'

  79

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे नाव ठेवले असून 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे शिंदे गटाचे नाव असेल. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाने ही माहिती दिली आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली आहे. बाळासाहेबांचे नाव वापरुन सहानुभूती दाखवायची गरज नाही. त्यांना हे नाव वापरण्याचा अधिकार नाही. आम्हाला पक्षप्रमुखांनी आदेश दिले नाहीत म्हणून आम्ही शांत आहोत, अशा भावना शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.


शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल बंडखोरांना दिलं. त्यानंतर आज शिंदे गटाचं नाव समोर येत आहे. शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असं नाव शिंदे गटानं निश्चित केलं आहे. याबद्दलची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. दरम्यान, शिंदे यांच्या गटाच्या नावात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचंही नाव आल्याने सेनेच्या गोटात नाराजी वाढली आहे.


शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करत खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा पेच आता वाढला आहे. दोन्ही गटांनी कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे.


आपल्यासोबत एकूण ४६ आमदार आहे. शिवसेनेचे दोन-तृतीयांश आमदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना माझ्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शिंदे त्यांच्या गटाला काय नाव देतात, याची उत्सुकता होती. शिंदेंनी आपल्या गटासाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.


आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसैनिकच राहू. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या मार्गावर आम्ही वाटचाल करत आहोत, असं शिंदे बंड केल्यापासून सांगत आहेत. बंडाच्या पहिल्या दिवसापासून त्यांची हीच भूमिका राहिलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेल्याची शिंदेंसोबतच्या आमदारांची भावना आहे.


माझ्यासोबत ३७ हून अधिक सेना आमदार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना माझ्यासोबत आहे, असं म्हणत शिंदेंनी थेट शिवसेनेवरच दावा केला आहे. पक्षाचं चिन्ह मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदुत्त्वासोबत तडजोड नाही म्हणत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. त्यामुळेच आधी आवाहनाची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सूरदेखील बदलला आहे. शिवसेना आणि ठाकरे ही नावं न वापरता जगून दाखवा, असं थेट चॅलेंज कालच उद्धव यांनी दिलं होतं.

Comments
Add Comment

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै

पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट! कोकण, मराठवाड्यातही वादळी पावसाचा अंदाज; IMD ने माहिती दिली

महाराष्ट्र : दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून,