ट्रान्सजेंडर जलतरणपटूंना महिला एलिट स्पर्धेत नो एन्ट्री

लंडन (वृत्तसंस्था) : जलतरणाची जागतिक प्रशासकीय संस्था फिनाने महिला वर्गात ट्रान्सजेंडर जलतरणपटूंना सामील होण्याबाबत कठोर नियम लागू केले आहेत. कोणत्याही ट्रान्सजेंडर जलतरणपटूला महिलांच्या आंतरराष्ट्रीय एलिट स्पर्धेत भाग घेता येणार नाही. सर्व प्रकारच्या जलतरणपटूंना सहभागी होता येईल असा खुला प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फिनाच्या या निर्णयानंतर अमेरिकेच्या लिया थॉमस सारख्या जलतरणपटूला जागतिक चॅम्पियनशिपसारख्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.


या वर्षी, थॉमस ही जलतरणात चॅम्पियन बनणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरली. थॉमस सुरुवातीला तीन वर्षे पुरुष गटात स्पर्धा करत होता. यानंतर ती महिला गटात सामील झाली आणि अनेक विक्रम केले. त्याबद्दल अनेक वाद झाले. यानंतर जलतरण आणि खेळातील श्रेणीबद्दल बरीच चर्चा झाली. महिलांच्या श्रेणीत ट्रान्सजेंडरचा समावेश केल्यामुळे महिलांना समान संधी मिळत नाही, असा अनेकांचा समज होता.


फिनाचा नवीन नियम फक्त जागतिक चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धांसाठी आहे, ज्या फिना स्वतः आयोजित करते. जेथे फिना जलतरणपटूंचे पात्रता निकष ठरवते. याचा ऑलिम्पिकमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या सहभागावर आणि महिलांच्या गटातील जागतिक विक्रमावरही परिणाम होईल. तथापि, फिनाच्या नवीन नियमांचे पालन राष्ट्रीय स्तरावर किंवा स्थानिक स्तरावर आवश्यक असणार नाही.


राष्ट्रीय महासंघ त्यांच्या स्पर्धांमध्ये त्यांचे स्वतःचे प्रमाण ठरवू शकतात. नवा नियम केवळ महिलांच्या गटात सहभागी होणाऱ्या ट्रान्सजेंडर जलतरणपटूंसाठी आहे. पुरुष गटात सहभागी होणारे ट्रान्सजेंडर पूर्वीप्रमाणेच सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. त्याच वेळी, एक खुला वर्ग देखील तयार केला जाईल, ज्यामध्ये सर्व प्रकारचे जलतरणपटू सहभागी होऊ शकतील.

Comments
Add Comment

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या