T20 WOrld Cup 2026 ZIM vs AUS: झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

श्रीलंका: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये (T20 WOrld Cup 2026) झिम्बाब्वेने सर्वात मोठा उलटफेर करून ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत केलं आहे.अंडर डॉग समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वे सारख्या संघाने क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. यापूर्वी २००७ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला एका रोमांचक सामन्यात पराभूत केलं होतं. त्यानंतर आता वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा पराभूत करून एक नवीन इतिहास रचला आहे.



झिम्बाब्वेच्या गोलंदाजी समोर कांगारू सरेंडर :


श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर २० ओव्हरमध्ये झिम्बाब्वेने २ विकेट गमावून १६९ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७० धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र मैथ्यू रेनेशॉच्या अर्धशतकीय खेळीनंतर सुद्धा ऑस्ट्रेलियाचा संघ १९.२ ओव्हरमध्ये १४६ धावांवर ऑलआउट झाला. अनुभवी खेळाडूंशिवाय झिम्बाब्वेने वर्ल्ड कप सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद ठरली.





कांगारूंचा डाव कोसळला:


१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. झिम्बाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ १४६ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेच्या कमालीच्या फिल्डिंग आणि बॉलिंगमुळे कांगारूंचा २३ धावांनी पराभव झाला.





गुणतालिकेतील समीकरण बदलले:


या ऐतिहासिक विजयानंतर 'ग्रुप बी' मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. झिम्बाब्वेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. झिम्बाब्वेसाठी हा केवळ विजय नसून जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याची मोठी संधी ठरली आहे.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच