पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. निकाताल मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. स्टेट बोर्डाच्या ९ विभागांपैकी निकालात कोकण विभाग ९९.२७ टक्क्यांसह अव्वल असून नाशिक विभाग ९५.९० टक्क्यांसह तळाशी गेलाय.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ९ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. यंदा राज्यातून एकूण १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली आहे.
तर राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागलाय. इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९६.१६ टक्के, नागपूर ९७, औरंगाबाद ९६.३३, मुंबई ९६.९४, कोल्हापूर ९८.५०, अमरावती ९६.८१ आणि नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…