लोकेश घेणार जर्मनीत दुखापतीवर उपचार

मुंबई (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरला नसल्याने इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला आहे. आता तो लवकरच जर्मनी येथे या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी जाणार असल्याचे समजते. याबाबत अद्याप बीसीसीआयने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.


भारतीय संघ आगामी इंग्लंड दौऱ्यामध्ये एका कसोटीसह प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला कसोटी सामन्यात हे दोन्ही संघ समोरासमोर असतील. त्यानंतर ७ ते १७ जुलै दरम्यान एकदिवसीय आणि टी-२० मालिका रंगणार आहे.


१ जुलैपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेसाठी भारतीय संघ गुरुवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला. दरम्यान, संघामध्ये कोहलीसह पुजारा, शुभमन गिल, सिराजचा समावेश आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत