अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' बांधणार- आदित्य ठाकरे

  102

अयोध्या (हिं.स.) : प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी खा. संजय राऊत आणि निलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.


याप्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची अयोध्या यात्रा राजकीय नसून आम्ही तिर्थयात्रेवर आलोय. अयोध्येत १०० खोल्यांचे भव्य महाराष्ट्र सदन व्हावे असा आमच्या सरकारचा मनोदय आहे. याबाबत उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा आपल्याला इथे निर्माण करायची आहे. गेल्या तीन वर्षात आपण शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे.


आता राम मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक रामजन्मभूमीत आले आहेत. सन २०१८ मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला आलो होतो. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती "पहिले मंदिर फिर सरकार". शिवसेनेच्या या भूमिकेनंतर वेगाने घडामोडी घडल्या, पुढे कोर्टाचा निकाल आला आणि मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी रामललाचे दर्शन घेतले. तसेच इस्कॉन मंदिराला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी इस्कॉन मंदिरात महाप्रसाद घेतला. त्यानंतर त्यांनी हनुमान गडी येथे जाऊन दर्शन घेतले.

Comments
Add Comment

भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत