आषाढी वारीमध्ये ड्रोन बंदी जिल्हा प्रशासनाचे आदेश

सोलापूर (हिं.स) : आषाढी यात्रा कालावधीत यंदा १२ ते १४ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घातल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीर केले आहेत.


त्यांनी आदेशात म्हटले आहे की, ३० जून ते १३ जुलै २०२२ या आषाढी वारी कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानांच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि इतर प्रांतांतून लाखो भाविक/ वारकरी येतात. ९ जुलै २०२२ रोजी सर्व पालख्या पंढरपूर येथे एकत्र येतात. लाखो भाविक मंदीर परिसरात एकाच ठिकाणी एकत्र आलेले असतात. या काळात नदी घाटावर, मंदिर परिसर, पालखी मार्गावर टी.व्ही. चॅनल्स, खाजगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. दहशतवादी घटनांचा विचार करता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करून त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


वारीमध्ये जास्तीत जास्त भाविक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ड्रोनची कल्पना नसते, छायाचित्रण केले तर वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) ३० जून ते १३ जुलै २०२२ अखेर पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचे श्रीमती पवार यांनी आदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी

caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव