२१ जुलैला भारताला नवे राष्ट्रपती मिळणार

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. पुढील महिन्यात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ जून ते २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर २ जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई पेन देण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी १,२,३ अशा पर्यायांची निवड करावी लागेल. पहिली पसंती न दिल्यास, मतदान रद्द केले जाईल.


या काळात राजकीय पक्ष व्हीप जारी करू शकत नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होणार असून, राज्यसभेचे महासचिव हे निवडणूक प्रभारी असतील. याशिवाय कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत खासदाराच्या मतांचे मूल्य ७०० असेल. यासोबतच तुरुंगात असलेले प्रतिनिधी मतदान करू शकतात, त्यांना पॅरोलसाठी अर्ज करावा. २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ४,८०९ मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ