विरार पूर्वेकडील रस्ता रुंदीकरणासाठी तलावाचा बळी

विरार (वार्ताहर) : रस्ता रुंदीकरणासाठी चक्क तलाव आठ ते दहा फूट बुजवून माती भराव करून रस्ता बनवण्याचे काम वसई-विरार महापालिकेने सुरू केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नेहमी पर्यावरणाच्या नावाखाली आवाज उठवणाऱ्या हरित पट्ट्यातच हा प्रकार सुरु असताना पर्यावरणप्रेमींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरार पूर्वेकडील नंदाखाल गावात चर्चशेजारील पुरातन तलाव आहे.


रस्ता रुंदीकरण करण्यासाठी एका बाजूने जवळपास ८ ते १० फूट बुजवून त्यावर माती भराव टाकून रस्ता तयार करण्याचा प्रताप महापालिका बांधकाम विभागाने सुरू केल्याचे दिसत आहे. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी उपसा करून हे काम सुरू असून महापालिकेच्या या प्रकारावर परिसरातील पर्यावरणप्रेमी व सजग नागरिक गप्प का?, असा सवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी उपस्थित केला आहे.


काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचण्यासाठी पुरातन तलाव बुजवण्यात येत असल्याची भावना व रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वसईच्या पश्चिम पट्ट्यातील बावखले, तलाव आणि विहिरींनी येथील पाण्याचे भूगर्भातील स्त्रोत कायम ठेवण्याचे काम केले आहे. म्हणूनच बावखल बचाव मोहीम या परिसरात राबवण्यात आली आहे.


एखाद्याने बावखल बुजवून घेर बांधण्याचे काम हाती घेतले तरी मोठा विरोध केला जात असल्याचे पहावयास मिळते. असे सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या पर्यावरणप्रेमींच्या गावातच पुरातन तलाव चक्क एका बाजूने बुजवून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना त्यावर कुणीही बोलताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

Comments
Add Comment

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व