मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मुंबईच्या चेंबूर व चांदिवली परिसरात मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी या मनसैनिकांना तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसैनिकांना नक्की का ताब्यात घेतले?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.
शुक्रवारी चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या वतीने पत्राची देव साक्षीने पूजा करून घरोघरी वितरण करण्याचा शुभारंभ योजण्यात आला होता. यावेळी घाटकोपर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेअकराच्या सुमारास चंदिवली विभागाचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली हे मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत शाखाध्यक्ष राहुल चव्हाण या पदाधिकाऱ्याला यावेळी ताब्यात घेण्यात आले. उशिरापर्यंत हे पदाधिकारी घाटकोपर पोलीस ठाण्यातच होते. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले नाही, ते हे पत्र त्यांच्या स्थानिक भागात वाटणार असल्याची माहिती भानुशाली यांनी दिली.
पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायला गेल्यास त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता मनसे याविरोधात आक्रमक होणार का?, हे पाहावे लागेल. राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की, ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्वीट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…