मुंबई (प्रतिनिधी) : दादर-धारावी नाल्याच्या बंदिस्त प्रवाहावर असलेला आणि माहीम उपनगरीय रेल्वे स्थानक व धारावी या परिसरांना जोडणारा पूल मोडकळीस आल्याने तो नव्याने बांधण्यात येणार आहे. तत्पूर्वी या परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी म्हणून या ठिकाणी जुना पूल तोडून त्यानंतर तब्बल ३० टन वजनाचा तात्पुरता पूल उभारण्याचे विक्रमी काम अवघ्या १७ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हा तात्पुरता पूल उद्या बुधवार, दिनांक १ जून २०२२ पासून वजनाने हलक्या वाहनांसाठी खुला केला जाणार आहे.
दादर-धारावी नाल्यावर बंदिस्त प्रवाह मार्गावर (कल्व्हर्ट) २० मीटर लांब आणि १६ मीटर रुंदीचा पूल मोडकळीस आल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर पूल हा माहीम स्थानक आणि धारावी या दोन्ही परिसरांना जोडणारा व अत्यंत वर्दळीचा आहे. पूल बंद करण्यात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांसह स्थानिक व्यावसायिकांना देखील वाहतुकीच्या अडचणी होऊ लागल्या. स्थानिक आमदार तथा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तातडीने आणि किमान तात्पुरता दिलासा देणारी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी देखील उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले व सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबतीने दिनांक ११ मे २०२२ रोजी या ठिकाणी पाहणी केली. मोडकळीस आलेला सद्यस्थितीतील पूल तोडून त्या ठिकाणी तातडीने तात्पुरता पूल बांधावा आणि पावसाळा संपल्यानंतर नियमित पद्धतीने पूल बांधावा, असे निर्देश वेलरासू यांनी दिले.
हा परिसर अत्यंत वर्दळीचा व घनदाट वस्तीचा असल्याने जुना पूल तोडून तात्पुरता पूल बांधणे जिकरीचे होते. हा तात्पुरता पूल १ जूनपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्याचे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होईल.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…