डिजिटल सातबारा शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी

  83

संदीप जाधव


बोईसर : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. त्यासाठी महत्त्वाचा दाखला हा सातबारा उतारा आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून डिजिटल सातबाराची सर्वर डाउन तसेच नेटवर्कचा खोळंबा असल्याने शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालयात तासंतास थांबावे लागत आहे.


कधी कधी डिजिटल सातबारा निघत नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागत आहे. परिणामी उतारा भावी कामे खोळंबली असून शेतकरी हैराण झाला आहे. डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महसूल खात्याने सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिले, मात्र सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना दाखला काढता येणे अवघड बनले आहे.


शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह सातबाराची ही मागणी केली जाते. तसेच सध्या पीक कर्ज काढण्यासाठी लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांना सातबारा आवश्यक आहे. सर्वर डाऊन होत असल्याने शेतकरी डिजिटल सातबारा मिळणे अवघड झाले असून सेतू केंद्र व महा ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या चकरा वाढल्या आहेत.


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय त्या भागातील महा-ई-सेवा केंद्र सेतू कार्यालय आदी ठिकाणी शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा मिळतो. दरम्यान, महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालयात डिजिटल सातबारा मिळणे कठीण झाले आहे. पर्यायी शेतकरी तलाठ्यांशी संपर्क करून सातबारा काढत आहेत.

Comments
Add Comment

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना