नाव बटलर, पण खरा ‘हिट’लर

अहमदाबाद/ मुंबई (प्रतिनिधी) : ‘ऑरेंज कॅप’ आणि ‘मॅन ऑफ द सिझन’चा मानकरी राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर याने मात्र, ऑरेंज कॅपची शर्यत जिंकली आहे. त्याने आयपीएलच्या या हंगामात केवळ सर्वाधिक धावाच केल्या नाहीत, तर सर्वाधिक शतकेही ठोकण्याचीही किमया केली आहे. बटलरने यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत सातत्यपूर्ण फलंदाजी केली.


बटलरने ८३ चौकार आणि ४५ षटकारांच्या मदतीने आणि ५७.५३ च्या सरासरीने ८६३ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४९.०५ इतका जबरदस्त राहिला आहे. त्याने या हंगामामध्ये एकूण चार शतके आणि चार अर्ध शतके झळकावली आहेत. ११६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, तो विराट कोहलीचा चारपेक्षा जास्त शतकांचा विक्रम मोडू शकलेला नाही.


विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्या आसपासही दिसत नव्हता. जोस पाठोपाठ लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल. राहुल याने १५ सामन्यात ६१६ धावा केल्या. लखनऊकडून खेळणाऱ्या क्विंटन डी कॉक याने तिसऱ्या क्रमांकावर राहत १५ सामन्यात ५०८ धावा केल्या. या सर्वांना मागे टाकून जोस फार पुढे गेला. मात्र, सातत्यपूर्ण खेळ करूनही त्याला आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यश आले नाही.


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि १५ लाख रुपये बक्षिस रक्कम दिली जाते. यावर्षी ही रक्कम जोस बटलरला देण्यात आली. याशिवाय त्याला ‘मॅन ऑफ द सिझन’च्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना