विलास खानोलकर
एकदा श्री स्वामी समर्थांनी बाळाप्पास ‘हिशोब असू दे बरे’ असे सांगितले होते. पुढे सुंदराबाईस श्री स्वामी सेवेतून काढल्यावर श्री स्वामी महाराज बाळाप्पास म्हणाले,‘हिशेब घेऊन ये बरे.’ श्री स्वामींचे बोलणे बाळाप्पास तेव्हा समजले नाही. परंतु विचार करता बाळाप्पास स्मारण झाले की, पूर्वी श्री स्वामी महाराजांनी ‘हिशेब असू द्या’ असे सांगितले होते, तेच हे असेल. म्हणून बाळाप्पाने जपाची संख्या श्री स्वामी महाराजांपुढे ठेवली. ती त्यांनी आपल्यापाशी ठेवून घेतली. पण तेव्हा ते काहीही बोलले नाहीत. एक दिवस कल्याण आप्पा वाणी श्री स्वामींच्या दर्शनास आला असता त्यास सांगितले, ‘बाळाप्पा अनुष्ठान करीत आहे. त्याच्या अनुष्ठानाची सांगता करावी.’ त्याने बाळाप्पास विचारून ब्राह्मण भोजन घातले. याप्रमाणे बाळाप्पाच्या नामजपाच्या अनुष्ठानाची त्यांनी सांगता करून घेतली.
स्वामी म्हणती ठेवा हिशोब अर्थ याचा नाम हिशोब ।। १।। नाही फक्त नामाचा हिशोब आयुष्याच्या ताळतंत्राचाच हिशोब ।। २।। वेळ घटीका पळेचा हिशोब देवकार्यातील पैपैचा हिशोब ।। ३।। व्यवहाराचा न ठेवता हिशोब पावती स्वामी होती क्रोध ।। ४।। पण भक्त प्रेमाचा नव्हता हिशोब श्रीकृष्ण सुदामा नव्हता हिशोब ।।५।। मीराकृष्ण प्रेम नव्हता हिशोब राधाकृष्ण प्रेम नव्हता हिशोब ।।६।। माता पुत्र प्रेम नाही हिशोब आजोबा नातू प्रेम नाही हिशोब ।।७।। गाय बछडा प्रेम नाही हिशोब चिमणी पाखरा दाणा पाणी नाही हिशोब ।।८।। राम हनुमान प्रेम नाही हिशोब सीताराम उमाशंकर नाही हिशोब ।।९।। तुकाराम विठ्ठल नाही हिशोब पुंडलीक पितृप्रेम नाही हिशोब ।।१०।। राम लक्ष्मण होते बंधू प्रेम वासुदेव देवकी खरे प्रेम ।।११।। कृष्ण अर्जुन गुरुशिष्य प्रेम लव अंकुश सीताराम प्रेम ।।१२।। हिरकणीचे खरे पुत्र प्रेम श्रीकृष्ण बलराम बंधुप्रेम ।।१३।। बाळाप्पा चोळाप्पा स्वामी प्रेम गुरुशिष्य अगणित प्रेम ।।१४।। स्वामींचे साऱ्या विश्वावर प्रेम दत्तगुरुचे गाईवासरे पुत्रप्रेम ।।१५।। ज्ञानेश्वर तुकोबा विठ्ठल प्रेम जिजाई शिवाई मातृप्रेम ।।१६।। गणितात हिशोबात हवा हिशेब प्रपंचात टाळावी चूक ठेवा खरा हिशोब।।1१७।। सार्वजनिक कार्यात चोख हिशोब जनता खवळून होईल क्षोब ।।१८।। स्वामी संदेश हृदयापासून स्वामीनाम नेईल पैलतीरी संसार नाव ।।१९।। न चुकता रोज घ्या बोध स्वर्गात द्यावा लागणार नाही हिशोब ।।२०।।
vilaskhanolkardo@gmail.com