
सातारा : जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अमलात आणण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात मिळत असल्याने पेट्रोल-डिझेलवरील करामध्ये ५० टक्के कपात करून दारूचा न्याय पेट्रोल, डिझेललाही लावलाच पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अनुक्रमे २.०८ रुपये व १.४४ रुपये कपातीचा पोकळ गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.