भंगार साहित्या मुळे मुंब्र्यातील नालेसफाई टांगणीला....

ठाणे (प्रतिनिधी) : मे महिना संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, पावसाळा उंबरठ्यावर आला आहे तरी देखील ठाण्यातील नालेसफाई बद्दल प्रश्नचिन्ह कायम असून अधिकाऱ्यांमध्येच नालेसफाई बद्दल एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे. नालेसफाईच्या बैठकीत अधिकाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांची साफसफाई झाल्याचे दिसून आले आहे.


महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नालेसफाईचा दौरा केल्यानंतर ७० ते ७५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असला तरी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये नालेसफाई केवळ ५० टक्केच झाली असल्याची माहिती देण्यात आल्यामुळे नाले सफाईच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनातच गोंधळ असल्याची गंभीर बाब सामोर आली आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नऊ प्रभाग समितीच्या अंतर्गत एकत्रच ही कामे सुरू करण्यात आली असून यासाठी ९ प्रभाग समिती अंतर्गत नऊ स्वतंत्र ठेकेदारांची नियुक्त करण्यात आली आहे. नालेसफाई करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा गांभीर्याने घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका झाली होती. या मुद्द्यावर सोमवारी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित ठेकदारांची बैठक घेऊन नालेसफाईचा आढावा घेतल्यानंतर ४० ते ५० टक्केच नालेसफाई झाला असल्याचा दावा या बैठकीमधून करण्यात आला आहे.


दरम्यान शहरात सर्व प्रभाग समित्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झाली असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.


कळवा-मुंब्रातील नालेसफाईचे आव्हान


कळवा-मुंब्रा परिसरातील नालेसफाई करणे हे प्रशासनासाठी आव्हान असते. या परीसरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्याच प्रमाणे नागरी वस्तीत असलेले अरुंद नाले त्यामुळे नालेसफाई करणार तरी कशी हा प्रश्न असतो. अनेक ठिकाणी नालेसफाई करण्यासाठी लागणारे यांत्रिक वाहन त्याचप्रमाणे राडारोडा उचलण्यासाठी ट्रक नाल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो, अशा अनेक अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान

उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत लागलेल्या चढाओढीमध्ये अखेर

नवी मुंबई महापालिकेत ७५० पदांची पोकळी

अनुभवी अधिकाऱ्यांची फळी निवृत्त नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज

सत्तेसाठी नाही, विकासासाठी मनसेचा कौल!

मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५२ नवीन चेहरे

माजी महापौर-उपमहापौरांना धक्का कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला असून या निकालात

अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल नवी मुंबई : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा

कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिकेतील