वादग्रस्त आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली

नवी दिल्ली (हिं. स.) : दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये खेळाडूंचा सराव थांबवून श्वानासोबत फिरल्यामुळे वादात सापडलेले आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची दिल्लीहून लडाखमध्ये बदली केली आहे. तसेच त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची यांचे अरुणाचल प्रदेशात स्थानांतरण करण्यात आले आहे.


केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता आणि अहवाल आल्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यागराज स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंकडून सतत तक्रारी येत होत्या की, त्यांना संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सराव संपवण्यास सांगितले जाते. दिल्ली सरकारचे प्रधान सचिव (महसूल) संजीव खिरवार संध्याकाळी ७.३०च्या सुमारास त्यांच्या श्वानासह फिरण्याकरिता दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये येत असत. त्यामुळे ७ वाजताच त्याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर काढले जात होते. दरम्यान या साऱ्याबाबत खेळाडू आणि प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.


यापूर्वी रात्री ८.३० पर्यंत ऍथलिट्स सराव करत असत, पण आता ६.३० वाजल्यापासूनच तेथील गार्ड्स शिट्टी वाजवण्यास सुरुवात करतात आणि मैदान मोकळे केले जाते. त्यामुळे आता त्यांना ३ किमीवरील जवाहरनगर स्टेडियममध्ये जावे लागत असे. विशेष म्हणजे संजीव यांचा कुत्रा मैदानात रेसिंग ट्रॅक, फुटबॉलचे मैदान साऱ्यावर फिरत असल्याचेही निदर्शनास आले होते. हा प्रकार समोर येताच दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली.

Comments
Add Comment

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

दिल्लीसह अनेक राज्यांत थंडीचा कहर

अनेक भागांत पावसाची शक्यता नई दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये कडक थंडी आणि धुक्याचा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद

अमेरिकन डाळींवर ३०% टॅरिफ; अमेरिकन शेतकरी अस्वस्थ

ट्रम्प यांना अमेरिकी सिनेटरांचे पत्र नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर जड टॅरिफ लादले असले तरी भारतानेही अमेरिकन

संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे ११४ राफेल खरेदीचा प्रस्ताव

लढाऊ विमानांच्या कमतरतेवर तोडगा नवी दिल्ली : फ्रान्सकडून आणखी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या दिशेने