उरणच्या हितेश भोईरला ३ सुवर्ण पदके

उरण : उरणच्या हितेश भोईरने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांची कमाई करत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.तिरुअनंतपुरम मास्टर्स गेम असोसिएशन, केरळ यांच्या वतीने तिरुअनंतपुरम येथे नुकतीच चौथी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये देशभरातील नावाजलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.


उरणमधील हितेश भोईर याने या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले. हितेशने या स्पर्धेमध्ये ५० मी. फ्रिस्टाईल, १०० मी. फ्रिस्टाईल आणि ४०० मी. फ्रिस्टाईल या तीन प्रकारांमध्ये वैयक्तिक तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.


४-५० मी. फ्रिस्टाईल रिले आणि ४-५० मी. मिडले रिले या दोन सांघिक जलतरण प्रकारांमध्ये रौप्य पदक मिळवून दिले. या यशाबद्दल हितेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना