मंकीपॉक्सचा धोका मुंबई पालिका सतर्क!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी मंकीपॉक्स या आजाराने भीती वाढली आहे. आफ्रिकन देशांसोबत युरोपातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत अजूनही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळलेला नाही, मात्र तरीही मुंबई महापालिकेने उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.


मुंबई महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांना याबाबत सतर्क केले आहे. रुग्णांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णाला त्वरित कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात यावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेले आहेत अशा देशातून भारतात परतलेल्या देशातील प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे.


कस्तुरबा रुग्णालयात मंकीपॉक्स संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष महापालिकेने तयार केला आहे. संशयित रुग्ण आढळल्यास त्याचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.


दरम्यान नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत आहे. लहान मुलांना सर्वाधिक मृत्यूचा धोका आहे. या आजारात ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशींमध्ये वेदना होतात. त्याचबरोबर थकवा जाणवतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात. काही रुग्णांच्या डोळ्यांवरही याचा परीणाम जाणवतो.


शनिवारपर्यंत जगभरातील १२ देशात एकूण ९२ मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. तसेच इतर २८ संशयित रुग्ण रुग्णालयाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे.

Comments
Add Comment

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर! मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ! महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या

वडाळा सहकार नगरमधील भाडेकरुंना मिळणार दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आयुक्तांना 'या' सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वडाळा सहकार नगर येथील महापालिका मालकीच्या इमारतींमध्ये महापालिकेचे भाडेकरु असून त्यांना

बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या वायू प्रदूषणावरील  नियंत्रणाबाबत  विचारमंथन,  झपाट्याने होणाऱ्या विकासासोबत काही आव्हाने मुंबई समोर

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगर वेगाने वाढत आहे. नवनवीन पायाभूत सुविधा प्रकल्प, गृहनिर्माण व वाहतूक सुविधा