सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील केळवे येथील वडाळा तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. ग्रामपंचायतीने हा तलाव एका ठेकेदाराला एक वर्षाच्या करारावर मासेमारीसाठी दिला होता. मासे कशाने मृत झाले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ठेकेदाराचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.
केळवे गावात वडाळा हा सर्वात मोठा तलाव असून या तलावाचे दोन भाग केले आहेत. हा तलाव सागर किणी या ग्रामस्थाने ग्रामपंचायतीकडून लिलावाने मासेमारीसाठी घेतला होता. यात काही भागीदारही आहेत. शुक्रवारी तलावातील एका भागीदाराने काही मासे काढून घेतले होते. शनिवारी सकाळी दुसरे भागीदार ममता किणी या तलावावर गेल्या असता तलावाच्या एका भागातील शेकडो मासे मृत्युमुखी पडलेले दिसले. त्यांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली.
हे मासे कशाने मृत झाले हे मात्र समजू शकले नाही. मात्र यामुळे आमचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ममता किणी यांनी सांगितले. आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीने याची चौकशी करावी, अशी मागणी किणी यांनी आहे.
केळवे गावातील तलाव लिलाव पद्धतीने सागर किणी यांना एक वर्षाच्या करारावर मासेमारीसाठी दिलेला आहे. यात काही भागीदार आहेत. तलावातील मासे मेल्याची तक्रार एका भागीदाराने केली आहे. मात्र मासे कशाने मृत झाले, हे समजू शकले नाही. नैसर्गिक आपत्ती या कोणत्याही कारणामुळे मासे मृत झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार नाही, असा करारही झालेला आहे. ठेकेदाराने योग्य त्या ठिकाणी तक्रार करावी. – भावना किणी, सरपंच, ग्रामपंचायत केळवे
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…
मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…