Tadgola : उन्हाळा सुरु होताच ताडगोळ्यांच्या मागणीत वाढ!

आदिवासी शेतकऱ्यांना मिळतो ताडगोळे विक्रीतून रोजगार


कासा : डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे दाखल झालेत. यामध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची (Tadgola) विक्री सुरू होत असून महालक्ष्मी मंदिर परिसरात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी गुजरात, मुंबईकडील येणारे भाविक व ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक असल्याचे निदर्शनास येत असून याच्या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे.



ताडगोळे ह्या फळाला विशेष महत्त्व असून उन्हाळी फळ (Summe Fruit) असलेल्या ताडगोळ्याला 'आईस ऍपल' संबोधले जाते. पांढरेशुभ्र फळ, रसदार गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांना आवडतात. डहाणू, तलासरी तालुक्यांमध्ये ताडगोळ्यांची विक्री केली जात असून सध्या बाजारात ८० ते १२० रुपये डझन भावाने ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे. ताडाच्या झाडावर उन्हाळ्याच्या हंगामात येणारी ही फळे चवीला गोड असून समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. डहाणू तालुक्यात ताडाची (माड) झाडे मुबलक प्रमाणात आहेत.


डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिर परिसरात सध्या ८० ते १२० रुपये डझनप्रमाणे फळांची विक्री सुरू असून इतर ठिकाणी फळे १६० ते २०० रुपये डझन प्रमाणे विकली जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. सध्या महालक्ष्मी मंदिर परिसरात १० ते १२ दुकानदार ताडगोळे विक्री करत असून महालक्ष्मी जत्रेत २५ ते ३० दुकानदार ताडगोळे विक्रीसाठी दाखल होतात. ताडगोळे विक्रीतून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Nashik Crime : विंचूरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या, कारसह ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला

Nashik : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती, पर्यायी जागांचा शोध

Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना

Jalgaon Crime : ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच, स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या कामासाठी ८५ हजार

Health Tips : शरीराला एका दिवसात किती तेलाची गरज असते? जाणून घ्या योग्य प्रमाण, अन्यथा होतील भयंकर आजार

भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजीला फोडणी देण्यापासून ते पराठे आणि तळलेले पदार्थ

Yaad Lagla Song Release : आकाश यादव - पूजा चव्हाण यांचं “याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना