पंतप्रधान मोदींचा लेख जपानच्या वृत्तपत्रात प्रकाशित

टोकीयो : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानच्या @Yomiuri_Online या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला असून तो सह-संपादकीय भागात प्रकाशित झाला आहे.


https://twitter.com/narendramodi/status/1528688959185772544

लेखाविषयी ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " भारत आणि जपान यांच्यामधल्या सळसळत्या, उत्साही संबंधांविषयी सह-संपादकीय- ऑप एड पानावर लेखन केले आहे. आमची भागीदारी ही शांतता, स्थैर्य आणि समृध्दी यांच्यासाठी आहे. या लेखामध्ये मी उभय देशाच्या मैत्रीच्या प्रवासाला 70 वैभवशाली वर्ष पूर्ण झाली आहेत, यावर विशेष भर दिला आहे.@Yomiuri_Online


कोविड नंतरच्या काळात भारत- जपान अधिक जवळचे आणि महत्वपूर्ण क्षेत्रात सहकार्य करणारे देश आहेत. आपली राष्ट्रे लोकशाही मूल्यांसाठी दृढपणाने वचनबद्ध आहेत. एकत्रितपणे आपण स्थिर आणि सुरक्षित इंडो- पॅसिफिक क्षेत्राचे प्रमुख आधारस्तंभ आहोत. आपण विविध बहुपक्षीय मंचावरही तितक्याच जवळिकतेने कार्य करीत आहोत, याचा मला आनंद आहे.


https://twitter.com/narendramodi/status/1528556366704410625

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असल्यापासून मला जपानी लोकांशी नियमित संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. जपानने विकासाच्या दिशेने वाटचाल करताना चढलेल्या पाय-या नेहमीच वाखाणण्यासारख्या आहेत. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवसंकल्पना, स्टार्टअप्स आणि इतर ब-याच महत्वाच्या क्षेत्रामध्ये जपान आणि भारत यांच्यामध्ये भागीदारी आहे." पंतप्रधान मोदी सध्या जपानच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

Comments
Add Comment

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी