एप्रिलच्या 'मन की बात' वर डिजिटल पुस्तिका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल महिन्यातील ‘मन की बात’ भागावर एक डिजिटल पुस्तिका प्रदर्शित केली.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मला पुढील आठवड्यात होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाबद्दल असंख्य सूचना येत आहेत. तरूण त्यांची मते मोठ्या प्रमाणावर व्यक्त करत आहेत, याचा मला आनंद आहे. गेल्या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाविषयी एक पुस्तिका प्रसिद्ध करत आहे. त्यात कार्यक्रमात चर्चा करण्यात आलेल्या अनेक रोचक गोष्टींविषयीच्या लेखांचा समावेश आहे."


२९ मे ला 'मन की बात'


पंतप्रधान नरेंद मोदी रविवार २९ मे सकाळी ११ वाजता 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८९ वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा पाचवा भाग असणार आहे.


नागरिक २६ मे पर्यंत ‘मन की बात' कार्यक्रमासाठी माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा 1800117800 क्रमांकाच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित करून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.


मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व