पुणे (हिं.स.) : पुण्यात आज गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेत निशाणा साधला आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठले आणि मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला.
अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली. पुण्यात गणेश कला क्रीडा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भोंग्यांच्या बाबतीतील पुढील आंदोलन, राणा दाम्पत्य, तसेच अयोध्या दौऱ्याला स्थिगिती या सर्वच विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले.
भोंग्यांच्या बाबतीत मी सांगितले काय की जर मशीदीवरती जोरात बांग दिली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा. आणि ते राणा दाम्पत्यांने काय केले. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा हट्ट.. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, अशा शब्दात राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला. हे कोणी केले आणि यानंतर लडाखला संजय राऊत आणि राणा भेटले यावरूनच पहा हे कोणी केलं असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…