वीजचोरांकडून अधिकारी वर्गाची वसुली;

उरण (वार्ताहर) : उरणमध्ये वीजचोरी मोठ्या प्रमाणात होत असून येथील काही अधिकारीवर्गच वीजचोरांना धमकावून त्यांच्याकडून मांडवली करून मालामाल झाले आहेत. वीजचोरही आपले प्रकरण उघड होऊ नये म्हणून मांडवली करून आपली सुटका करत असल्याच्या काही वीजचोरांनी ही धक्कादायक माहिती दिली. याबाबत वरिष्ठ अधिकारी गणेशकर यांच्याकडे येथील अधिकारी वर्गाच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी सामाजिक संघटना करणार असल्याचे समजते.


विजेचा वापर वाढल्याने वीजबिलांचा आकडाही फुगत चालला आहे. त्यामुळे यातून सुटका करण्यासाठी वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. हाच मोका साधत अधिकारी वर्गाचे पथक रात्रीच्यावेळी फिरत अनेक ठिकाणी वीजचोरी पकडत आहेत. पकडण्यात आलेल्या वीजचोरांना अव्वाच्या सव्वा दंड व बेइज्जत होण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन वीजचोरी प्रकरण रफातफर करून मोकळे होत आहेत.


यामुळे वीज मंडळाचा महसूल बुडत असून, अधिकारी वर्ग मालामाल होत आहे. याची लेखी तक्रार वरिष्ठ अधिकारी गणेशकर यांच्याकडे करून उरणमधील अधिकारी वर्गांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक संघटना करणार आहे. अन्यथा वेळ पडल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,