करंजाडी जिप गटात तिरंगी लढत

महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनेमध्ये फूट पडल्या नंतरही हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात आ. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वा खाली शिवसेना शिंदे गटाने यश मिळवले होते. मात्र २०१७ नंतर राजकीय स्थित्यंतरानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषदेचे पाच व पंचायत समितीचे दहा मतदारसंघ आपल्याकडे राखणे हे शिवसेना शिंदे गटापुढे मोठे आव्हान असणार आहे.


२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात एकत्रित शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली होती. २०२६ मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत १३६६९ पुरूष व १४०३८ स्त्री अशा एकुण २७ ७०७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. करंजाडी मतदारसंघात उबाठाचे उमेदवार सोमनाथ ओझर्डे यांचे शिवसेनेसमोर आव्हान आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि उबाठा सरळ लढत होईल, मात्र ऐनवेळी उबाठातून भाजपमध्ये जाऊन अमित मोरे हे भाजप राष्ट्रवादी युतीतून या गटात उभे राहिल्याने ही लढत आता तिरंगी होणार आहे.


करंजाडी मतदारसंघातील राजकीय बलाबळ पाहता या मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. उबाठा, भाजप व काँग्रेसचे प्राबल्य त्यामानाने कमी आहे. मात्र या गटात शिवसेना, उबाठा आणि भाजप-राष्ट्रवादी युती अशी तिरंगी लढत होणार असल्याने मत विभाजनाचा फटका तीनही उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. करंजाडी पंस गणात उबाठाने आपला उमेदवार दिला नाही. या ठिकाणचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुमित तुपट हे उबाठाचे उमेदवार ओझर्डे यांचे निकटवर्तीय असल्याने या ठिकाणी ठाकरे गटाची मते राष्ट्रवादीचे तुपट यांच्या पारड्यात पडणार आहेत. परंतु तुपट यांना पडणारी हीच मते ओझर्डे आणि मोरे यांच्यात विभागली जाणार. विन्हेरे पं. स. गणात उबाठाने आपला उमेदवार दिला आहे. हा उमेदवार राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची मते फोडण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवारांना मतदान होताना क्रॉस वोटिंगचा फटका सर्वच उमेदवारांना होणार आहे.
या गटात प्राबल्य असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीची मते ही आपापल्या उमेदवारांना पडली तर मुख्य लढत निलेश ताठरे आणि अमित मोरे यांच्यात होईल मात्र राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा उबाठाचे उमेदवार ओझर्डे यांना मिळाला तर भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार अमित मोरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील आणि मुख्य लढत ही निलेश ताठरे आणि सोमनाथ ओझर्डे यांच्यात होईल असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत पाहता या मतदारसंघात होणारे मतांचे विभाजन रोखण्यात जो पक्ष यशस्वी ठरेल त्याच पक्षाचा उमेदवार बाजी मारेल.

Comments
Add Comment

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Mumbai-Goa Express Highway : कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस थेट विमान सेवा

नवी मुंबई विमानतळ : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NHIA)