Categories: क्रीडा

राजस्थानचा ‘प्ले-ऑफ’ प्रवेश यशस्वी

Share

मुंबई (प्रतिनिधी) : यशस्वी जयस्वालची धडाकेबाज सलामी आणि अनुभवी रविचंद्रन अश्वीनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे शुक्रवारी राजस्थानने चेन्नईवर मात करत ‘प्ले-ऑफ’ मध्ये दिमाखात प्रवेश केला. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल यांची धावा रोखणारी आणि बळी मिळवणारी गोलंदाजीही राजस्थानच्या विजयात मोलाची ठरली. २० षटकांत १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानसाठी मोठे नसले तरी त्याचा पाठलाग करताना राजस्थानचा दम निघाला.

जयस्वाल धावा जमविण्यात यशस्वी ठरला असला तरी जोस बटलर, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांच्या अपयशाने राजस्थानची डोकेदुखी वाढवली. जयस्वालने संघातर्फे सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले. दरम्यान शेमरॉन हेटमायरनेही नाराज केल्याने राजस्थानच्या अडचणीत आणखी वाढ झाली. तळात रविचंद्रन अश्वीनने अनुभव पणाला लावत संघाला आवश्यक असलेली खेळी खेळली. मोक्याच्या क्षणी अश्वीनची खेळी संघाच्या विजयात निर्णायक ठरली. अश्वीनने ४० धावा ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानने १९.४ षटकांत पूर्ण केले. ५ विकेट राखून राजस्थानने हा सामना खिशात घातला.

नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रुतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे या सलामीवीरांनी नाराज केल्यानंतर मोईन अलीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत राजस्थानच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दुसऱ्या फलंदाजाकडून साथ मिळाली नसली तरी मोईनने एका बाजूने धावांचा ओघ कायम ठेवला. त्यामुळे दोन फलंदाजांमध्ये भागीदारी झाली नसली तरी चेन्नईचे धावफलक खेळते राहीले. मोईन अलीने ५७ चेंडूंत ९३ धावांची उपयुक्त खेळी खेळली. त्याला धोनीने बरी साथ दिली.

धोनीने २८ चेंडूंत २९ धावांचे योगदान दिले. चेन्नईने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १५० धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली आणि धोनी वगळता चेन्नईचे अन्य फलंदाज राजस्थानच्या सापळ्यात झटपट अडकले. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्वीन या गोलंदाजांच्या तिकडीने चेन्नईचा कणाच मोडला. त्यांनी धावा रोखण्यात आणि बळी मिळवण्यातही यश मिळवले. त्यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago