अत्यल्प दर मिळाल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

Share

समीर पठाण
लासलगाव : विंचूर उपबाजार कांदा आवारात गुरुवारी झालेल्या कांदा लिलावात देशमाने बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु. क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे नाराज झालेल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ४०० ते ५०० बाजारभाव इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच पण वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यात देशमाने येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी सुशील दुघड यांनी त्यांचा गोलटी स्वरूपातील कांदा विंचूर उपबाजार येथे लिलावासाठी आणला होता. लिलावात या कांद्याला २०० रुपयांची बोली लावण्यात आली. परंतु कांद्याची प्रतवारी तुलनेत थोडी कमी असल्याने लिलावात शिव भोले या कंपनीने या कांद्याला ५१ रु. प्रति क्विंटल बोली लावल्यामुळे नाराज झालेल्या या शेतकऱ्याने हा कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले. तर बाजार समिती प्रशासनाने याबाबत सांगितले की लिलावास आलेला कांदा हा खूपच कमी गुणवत्ता असलेला असून खाण्या योग्य व प्रतवारी केलेला नसल्याने या कांद्याला जाहीर लिलावात कमी दर मिळाला आहे.

सद्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीस मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. उष्णतेमुळे कांद्याची प्रतही खराब होत आहे. साठवणूक झाल्यानंतर उर्वरित कांदा शेतकरी लिलावासाठी बाजार समितीत आणत आहेत. उष्णतेमुळे या कांद्याची प्रत घसरली असल्यामुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून लिलावासाठी आणल्यास योग्य असे बाजारभाव मिळतील, असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Recent Posts

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

21 minutes ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

39 minutes ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

52 minutes ago

भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…

56 minutes ago

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

1 hour ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

2 hours ago