कासा (वार्ताहर) : डहाणू तालुका हा आदिवासीबहुल भाग असून ग्रामीण भागात एप्रिल, मे, जून या महिन्यांत येथील नागरिक, मजूर, पोटापाण्यासाठी मोलमजुरीच्या शोधात कुटुंब काफिल्यासह स्थलांतरित होतात. पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्या गावी परततात. येथील आदिवासी मजूर स्थलांतरित होऊ नये म्हणून कृषी विभागाने रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरु केली आहेत.
वेती वरोती ग्रामपंचायत हद्दीत रोजगार हमी योजनेमधून जुनी भातशेती दुरुस्ती, बांधबंदोस्तीची कामे सुरु केली असून यात ६४ मजूर गेल्या एक महिन्यापासून रोजगार मिळवत आहेत. वेती येथील दोन हेक्टर जागेत जवळपास ९० हजारांचे काम सुरु आहे.
तर कोदेपाडा येथे एक लाख ३२ हजारांचे काम सुरु आहे. या कामामुळे अनेक गरीब कुटुंबाच्या हाताला काम मिळाले असून ती कुटुंबे स्थलांतरित होण्यापासून वाचली आहेत. यासाठी ग्रामपंचायतचे सहकार्य मिळाले असून तालुका कृषी अधिकारी संतोष पवार, कृषी पर्यवेक्षक सुनीता शरपाक, संदीप संख्ये, कृषी सहाय्यक अजय आंबेकर मेहनत घेत आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…