जव्हारमध्ये बनावट धनादेश प्रकरणातील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

पालघर : सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार कार्यालयातील बनावट धनादेश प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणात शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार येथील धनादेश क्र. ०६९२१८ वर लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या बनावट सह्या करून रु. १,११,६३,३१,८१०/- (एकशे अकरा कोटी त्र्येसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा रुपये) इतक्या रकमेचा धनादेश ओव्ही कन्स्ट्रक्शनला देण्यासाठी तयार करण्यात आला होता. हा धनादेश आरोपी यज्ञेश दिनकर अंभिरे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा जव्हार येथे सादर केला; परंतु तो वटला गेला नाही. नंतर ओव्ही कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडवळे यांनी तो धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.


सदर प्रकरणाबाबत कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८१/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता १८६० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी आरोपी निलेश रमेश पडवळे आणि यज्ञेश दिनकर अंभिरे यांना दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करून सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत राहिले आणि नंतर जामिनावर मुक्त झाले होते. मात्र तपास अद्याप अपूर्ण असल्याने आर्थिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पुन्हा पोलीस कोठडीसाठी न्यायालयात दाद मागितली.त्यांची पोलीस कोठडी २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मंजूर केली आहे.

Comments
Add Comment

Vasai-Virar garbage scam : वसई-विरारच्या 64 कोटींच्या कचराघोटाळा प्रकरणात कंत्राटदारांवर गुन्हे दाखल

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील 64 कोटी रुपयांच्या बायो-मायनिंग घोटाळ्यात अखेर

Palghar Crime : पहाटे घराबाहेर पडली, प्रियकराच्या घरी गेली अन्...१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

पालघर : पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू तालुक्यात (Dahanu News) एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली असून, १७ वर्षीय

Palghar News : मोखाड्यात १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप; २२ महिलांविरोधात गुन्हा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा

Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत

Palghar Blast Tarapur : तारापूर MIDC मध्ये भयंकर दुर्घटना! 'विराज प्रोफाइल'मध्ये एकापाठोपाठ ३ भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रात आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ तीन महाभयंकर स्फोटांनी थरकाप

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील