आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू गाडीमध्ये हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जगताप यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. तसेच या अपघातात अन्य कोणीही जखमी झालेले नाही. मात्र जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास रसायनीजवळ हा अपघात झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यांचे काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आहे. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे गाडी बसवर मागील बाजूने धडकली.


दरम्यान, नगरकर नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आपण या भयंकर संकटातून सुखरूप बचावलो, अशी प्रतिक्रिया जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या