मुंबई : पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईत फक्त ३६ टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश आणि जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात का? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.
मुंबईत ३८६ फ्लडिंग पॉईंट आहेत. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देण्यापलीकडे आपण काय केले आहे? की यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश आणि जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात? असा सवाल नितेश राणे यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला विचारला आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
मुंबईतील फ्लडिंग पाईंट्स इथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाययोजना केल्या आहेत? राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तिथल्या नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात याविषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.
पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्याने प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले. तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करु शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करुन गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मूळ समस्येकडे पण लक्ष दिले पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही.
तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याची ठिकाणे आहेत. ज्याला आपण फ्लडिंग पॉईंटस म्हणतो. यापैकी २८ ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील २५ फ्लडिंग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडिंग पॉईंट्स इथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. या फ्लडिंग पाईंट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे.
राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात.
पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईतील नालेसफाईचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. मुंबई शहरातील नालेसफाई १८ टक्के झाली आहे. तर पूर्व उपनगरात ४४ टक्के आणि पश्चिम उपनगरात ३६ टक्के नालेसफाई झाली आहे. मुंबईत एकूण ३६ टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुंबईची यंदाही तुंबापुरी होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…