आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती


मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे पर्यटक, नागरिकांना मुंबई महानगरपालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. समुद्राला ४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती येणार आहे. किनाऱ्यावर साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीचा तपशिल मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरतीदरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंची नमूद करण्यात आली आहे. समुद्रात ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३९ च्या सुमारास ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पुढील तीन दिवस मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यानजीक जाऊ नये, तसेच या अानुषंगाने मुंबई  महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्या दरम्यानच समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पालिका प्रशासनाने सूचित केले आहे.


मोठ्या भरतींचा तपशील खालीलप्रमाणे :


दिवस वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)
गुरुवार ४ डिसेंबर रात्री ११:५२ ४.९६
शुक्रवार ५ डिसेंबर सकाळी ११:३० ४.१४
शुक्रवार ५ डिसेंबर मध्यरात्री १२:३९ ५.०३
शनिवार ६ डिसेंबर दुपारी १२.२० ४.१७
शनिवार ६ डिसेंबर मध्यरात्री १.२७ ५.०१
रविवार ७ डिसेंबर दुपारी १.१० ४.१५

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)